Friday, April 8, 2016

आरंभ : आनंदाडोही !

आरंभ : आनंदाडोही  !

II ॐ II 
चैत्र शुद्ध १ , गुढीपाडवा ( ८ एप्रिल २०१६ )

नमस्कार मंडळी !

आज पाडवा , नवीन वर्षाची नवीन सुरुवात !  

सकाळीच तुकाराम महाराजांचे " आनंदाचे डोही आनंद तरंग " हे गाणे ऐकले . त्यात तुकाराम महाराज म्हणतात की देव हा समस्त आनंदाचा डोह आहे आणि तो आनंदाचे तरंग सर्व सृष्टी मध्ये पसरवत असतो . न जन्मलेले मुल आईच्या गर्भात असताना त्याला नवीन नवीन चवी आवडू लागतात आणि आई त्या बाळाच्या इच्छा आपल्या डोहाळाणे पुरविते . जसे गर्भातल्या मुलाचे आईला समजते तसाच अनुभव तुकाराम महाराजांना देवाचे गुणगान गाताना येतो . जे त्यांना मनातून वाटते तेच त्यांच्या ओठावर येते असे ते म्हणतात . 

असेच मनातले विचार ओठांवर यावे आणि ते शब्दबद्ध ह्वावे असे वाटायचे ! त्या निमित्ताने खूप दिवस झाले मनात विचार चालू होता कि ब्लॉग सुरु करावा . २०१२ साली पाऊल ट्रेकर्स संस्थेशी जोडलो गेलो आणि एक वेगळीच मुलूखगिरी सुरु झाली . नवीन मित्र भेटले आणि नवीन ठिकाणे पहावयास मिळाली. चाकोरी बाहेरचे किल्ले , वेगवेगळ्या ऋतू मधील निसर्ग , त्या प्रदेशातील जडण घडण आणि अनेक सामाजिक उपक्रम जवळून पाहता आले . पाऊलच्या मित्रांनी दिलेली कौतुकाची थाप आणि आप्तांनी दिलेल्या  प्रोत्साहना मुळे मी हा ब्लॉग  सुरु करत आहे .

आपल्या सारख्या सुज्ञ "नेटकरी" मंडळींचा माझ्यावर लोभ असावा हीच श्री चरणी प्रार्थना !



तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ।



5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Khupch chaan naren.. navin varshachi chaan survaat kelis.. mazha ani mazha parivarakdun khup khup shubhechha.....

    ReplyDelete
  3. आमचा सदैव पाठींबा असेल नरेंद्र................

    ReplyDelete

जोगेश्वरी लेणी - मुंबई

जोगेश्वरी लेणी -  मुंबई  मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर ! ह्या शहरात लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे पळत असतात. पण अश्या गजबजलेल्या शहरा...