आरंभ : आनंदाडोही !
II ॐ II
चैत्र शुद्ध १ , गुढीपाडवा ( ८ एप्रिल २०१६ )
नमस्कार मंडळी !
सकाळीच तुकाराम महाराजांचे " आनंदाचे डोही आनंद तरंग " हे गाणे ऐकले . त्यात तुकाराम महाराज म्हणतात की देव हा समस्त आनंदाचा डोह आहे आणि तो आनंदाचे तरंग सर्व सृष्टी मध्ये पसरवत असतो . न जन्मलेले मुल आईच्या गर्भात असताना त्याला नवीन नवीन चवी आवडू लागतात आणि आई त्या बाळाच्या इच्छा आपल्या डोहाळाणे पुरविते . जसे गर्भातल्या मुलाचे आईला समजते तसाच अनुभव तुकाराम महाराजांना देवाचे गुणगान गाताना येतो . जे त्यांना मनातून वाटते तेच त्यांच्या ओठावर येते असे ते म्हणतात .
असेच मनातले विचार ओठांवर यावे आणि ते शब्दबद्ध ह्वावे असे वाटायचे ! त्या निमित्ताने खूप दिवस झाले मनात विचार चालू होता कि ब्लॉग सुरु करावा . २०१२ साली पाऊल ट्रेकर्स संस्थेशी जोडलो गेलो आणि एक वेगळीच मुलूखगिरी सुरु झाली . नवीन मित्र भेटले आणि नवीन ठिकाणे पहावयास मिळाली. चाकोरी बाहेरचे किल्ले , वेगवेगळ्या ऋतू मधील निसर्ग , त्या प्रदेशातील जडण घडण आणि अनेक सामाजिक उपक्रम जवळून पाहता आले . पाऊलच्या मित्रांनी दिलेली कौतुकाची थाप आणि आप्तांनी दिलेल्या प्रोत्साहना मुळे मी हा ब्लॉग सुरु करत आहे .
आपल्या सारख्या सुज्ञ "नेटकरी" मंडळींचा माझ्यावर लोभ असावा हीच श्री चरणी प्रार्थना !
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ।
This comment has been removed by the author.
ReplyDeleteKhupch chaan naren.. navin varshachi chaan survaat kelis.. mazha ani mazha parivarakdun khup khup shubhechha.....
ReplyDeleteThanks a lot Sid :)
Deleteआमचा सदैव पाठींबा असेल नरेंद्र................
ReplyDeleteThank you Rama Dada :) Your Support means a lot :)
Delete