चावंड किल्ला , जुन्नर , पुणे
जुन्नर :
जुन्नर !
शिवरायांच्या जन्मभूमीमुळे पावन झालेल्या
जुन्नरचा इतिहास आपल्याला सातवाहन
काळात नेऊन ठेवतो
.
अनेक किल्ले ,
लेण्या ,
मंदिरे
,
पुरातन व्यापारीरस्ते आणि पर्यटन
स्थळे आपल्याला ह्या
परिसरात पाहायला मिळतात.
इतिहासाच्या
पाऊलखुणा शोधायच्या झाल्या तर
इतिहासातील सोनेरी कालखंडाचे पुरावे
येथे आजही उभे
आहेत.
जुन्नर म्हणजे
सातवाहन काळाचे जीर्णनगर होय.
जुन्याकाळी कल्याण बंदरावर उतरलेला
माल नाणे घाट
मार्गे येऊन
जुन्नरला येत असे
आणि तो जुन्नर
मार्गे पैठणला जात असे
.
पैठण म्हणजे सातवाहनकालचे "
प्रतिष्ठान".
पैठण तेव्हा सातवाहनांची
राजधानी होती.
कल्याण-
नाणे
घाट-
जुन्नर-
नगर-
पैठण हा
महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग
होता.
जुन्नरच्या डोंगराळ
भागातून येणार्
या या
व्यापारीमार्गाचे संरक्षण व्हावे आणि
लूटमारीपासून बचाव व्हावा
म्हणून त्या त्या
वेळच्या राजवटींमध्ये भैरवगड,
जीवधन,
चावंड,
हडसर,
निमगिरी,
ढाकोबा,
शिवनेरी,
नारायणगड,
शिंदोला,
रांजणगड,
कोंबडकिल्ला यासारख्या किल्ल्यांची निर्मिती
झाली.(
संदर्भ :
जुन्नर
तालुकचा इतिहास) .
नाणेघाटाच्या रक्षणासाठी
म्हणून जीवधन -
हडसर -
शिवनेरी
आणि चावंड किल्ल्यांचा
उपयोग होत असे.
म्हणूनच " नाणेघाटाचे पहारेकरी " म्हणून
ह्या ४ किल्ल्यांना
ओळखले जाते.
 |
मुख्य दरवाज्यावर कोरलेले गणेश शिल्प आणि भिंतीवर कोरलेला गणपती |
चावंड किल्ला आणि आम्ही
:
होळीमुळे लागून
३ सुट्ट्या आल्या
होत्या. काही तरी
मोठा प्लॅन करावा
असे ठरले आणि
सर्व मोठे प्लॅन
जसे केले तसे
फिस्कटले. ३ दिवस
जमले नाही तरी
किमान १ दिवस
तरी ट्रेकला जायचे
असे ठरले आणि
राहूलने चावंड किल्ल्याबद्दल सांगितले.
गड सोपा आणि
एका दिवसात करून
येण्यासारखा होता. त्यामुळे सर्व
तयार झाले. "नाणेघाट-जीवधन - हडसर - शिवनेरी
आणि चावंड" या
जुन्नरमधील ५
ठिकाणांना "फेमस 5 " असे म्हणतात. माझा
एक वैयक्तित हेतू
असा होता की फेमस
5 संचातील चावंड किल्ल्याला मी
भेट दिली नव्हती
म्हणून मी ह्या
ट्रेक साठी एका
पायावर तयार झालो.
सर्व नियोजन राहुल
आणि सोनलने केले
. चावंड किल्ल्याला आम्ही रविवारी
भेट देणार होतो. योगायोगाने
रविवार दिनांक ४ मार्च
२०१८ ला तिथीप्रमाणे
शिवजयंती होती. शिवजयंतीच्या दिवशी
कोणत्याही किल्ल्याला भेट देणे
आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती.
शिवरायांविषयीचा आदर आणि
गडकिल्ल्यांची आवड ह्या
एकमेकांना पूरक गोष्टी
आहेत. गडकिल्ले फिरताना
आणि पाहताना अनेक
गोष्टी शिकायला मिळतात. सोबत
मिळतो तो आनंद
भटकेगिरीचा !
कल्याण वरून रात्री
१०.३० ची
"कल्याण - पाथर्डी " ही
नगरला जाणारी लालगाडी पकडली.
आळेफाट्याला उतरून तिथून लगेच
आम्हाला नारायणगाला जाणारी एस
टी मिळाली . नारायणगावात
मात्र आम्हाला जुन्नरला
जाण्यासाठी पहिली एसटी
पहाटे ५.३०
ची होती . त्यामुळे
नारायणगावी पहाटेच चहा आणि
मसाला दूध पिऊन
थोडा आराम केला.
तिथून पहाटे ५.३० ची
जुन्नर गाडी पकडून
जुन्नरला आलो . पहाटेचे ६
वाजले होते आणि
शिवजयंतीचा उत्साह खूप होता
. चौकाचौकात शिवजयंती साजरी केली
जात होती . मिरवणुकीची
तयारी भल्या पहाटे
चालू होती . समोरच
दिसणारा शिवनेरी किल्ला रोषणाईने
उजळून निघाला होता.
जुन्नर चौकातील महाराज्यांच्या पुतळ्याचे
दर्शन घेऊन एका
खाजगी रिक्षाने चावंडवाडीस
पोहोचलो. कल्याण- आळेफाटा - नारायणगाव-
जुन्नर - चावंडवाडी ह्या प्रवासाचे
मोल खूप होते
कारण पूर्वी खर्चासाठी
आमच्याकडे ठराविक रक्कम असायची
त्यामुळे बजेट मध्ये
गडवारी करायची म्हणजे एसटीचा
प्रवास सोईस्कर असायचा . खूप दिवसांनी
असा टप्प्याटप्याचा एसटी प्रवास
केला होता त्यामुळे
आमच्या सर्व जुन्या
आठवणींना उजाळा मिळाला.
 |
चावंड किल्ला प्रवेशद्वार |
चावंडवाडी ते चावंडचा
किल्ला :
चावंड किल्ल्यावर चामुंडा देवीचे मंदिर आहे. चावंड
हे नाव चामुंडा
या शब्दाचा अपभ्रंश
आहे. कदाचित देवीच्या
नावामुळेच किल्ल्याला चावंड हे
नाव मिळाले असावे.
चुंड - हे निजामशाही
नाव आहे. प्रसन्नगड-हे शिवाजी
महाराजांनी ठेवलेले नाव आहे
. आम्ही अगदी पायथ्याजवळ
उतरलो आणि लागलीच
ट्रेक सुरु केला.
सकाळी वातावरण प्रसन्न
होते. पक्षी निरीक्षणासाठी
खूप चांगला वेळ
होता. अनेक पक्ष्यांचे
आवाज कानात गुंजत
होते आणि अनेक
ओळखीचे आणि अनोळखीचे
पक्षी आम्हाला वाटेमध्ये
दिसत होते. गडावर
जाणारा मार्ग चांगला आहे
आणि एखद्या उंचावर
असलेल्या मंदिरावर जश्या पायऱ्या
बनवलेल्या आहेत या
प्रमाणे अगदी गड्माथ्यापर्यंत
येथे पायऱ्या वनखात्यांने
बनवल्या आहे. ह्या
गडावर जाणाऱ्या पायऱ्या
ब्रिटिशांनी सुरुंग
लावून फोडल्या होत्या.
त्यामुळे मध्यभागी रेलिंगची वाट
सुरू होते. रेलिंगमुळे
चढाई अतिशय सुरक्षित
झाली असून ज्यांनी
हे काम केले
त्यांचे सर्व ट्रेकर्सनी आभार
मानले पाहिजे असे
मला वाटते. मध्येच
वाटे मध्ये जंबुरका
प्रकारातील एक छोटी
तोफ जमिनी मध्ये
पुरली आहे. रेलिंग
नसताना आधाराकरिता ती तोफ
जमिनीत पुरली असावी असे
वाटते. पुढे लवकरच
दगडी पायऱ्या लागतात
ज्या उंचीने थोड्या
मोठ्या आहेत. त्या पार
केल्या की
आपण थेट पहिल्या
प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. प्रवेशद्वार
त्या पायऱ्यांच्या काटकोनात
बांधलेले आहे. त्यामुळे
खालून वा अगदी
पायऱ्या चढून आले
तरीही प्रवेशद्वार दृष्टीस
पडत नाही. हा
बुरूज प्रवेशद्वाराचे रक्षण
करतो. प्रवेशद्वारावर दगडी
कमानीतच गणपती कोरलेला आहे
तसेच भिंतीवर हि
गणपतीची कोरीव मूर्ती आहे
.
 |
रेलिंगचा मार्ग |
गडमाथा :
गडमाथा विस्तीर्ण आहे आणि
गडावर खूप पाण्याच्या
टाक्या आहेत. सर्वप्रथम काही
पडलेल्या वाड्यांचे
अवशेष पाहून आम्ही
गडावरील सर्वोच्च ठिकाणावर गेलो
जिथे चामुंडा देवीचे
मंदिर आहे . मंदिराची
बांधणी आता नव्या
पद्धतीने केली असली
तरी मंदिर हे
खूप जुने आहे
.आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष
विखुरलेले दिसतात. एक तुटलेली
मूर्ती आढळते. देवीचे दर्शन
घेताना खूप छान
वाटले . मंदिर कसे ही
असो देवाच्या गाभाऱ्यात
मनःशांती मिळतेच . ह्याच
मंदिराच्या पाठी आम्ही
सकाळचा नाश्ता केला आणि
आमच्या फसलेल्या प्लॅनची मजेदार
चर्चा केली . सरतेशेवटी
आपण चावंड किल्लावर
पोहोचललो आणि आता
खूप चांगले पाहण्यास
मिळणार ह्यामुळे आम्हाला
जास्त आनंद होत
होता. अगदी थोडा
वेळ विश्रान्ती
करून आम्ही उर्वरित
किल्ला पाहण्यास निघालो.
किल्ल्यावरील
पाण्याचा साठा आणि
भग्न वाड्यांचे अवशेष
पाहून असे वाटते
की ह्या
किल्ल्यावर अनेक माणसाचा
राबता असणार. वर्षभर
किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई
होत नसावी असे
दिसते. सप्तमातृका कुंडांकडे जाताना
त्या वेळेची दगडी
शौचालये पाहायला मिळतात . पुढे
गेलो तर सप्तमातृका
कुंड दिसतात. पाण्याची
७ टाकी एकाच
ठिकाणी आढळून येतात . किल्ल्यावर
जाऊन हे कुंड
अजिबात चुकवू नये असे
आहेत. सप्त मातृका
म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी,
वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि
चामुंडा. या सर्वांमध्ये
चामुंडा श्रेष्ठ मनाली जाते.
या कुंडाच्या पहिल्या
टाक्याला प्रवेद्वार आहे आणि
त्या प्रवेशद्वारावर ही
सुंदर गणपतीचे शिल्प
कोरले आहे. थोडे
खाली उतरून गेलात
तर आपल्याला गुहा
दिसतात . धान्य किंवा दारुगोळा
ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होत
असावा असे वाटते.
येथे एक चोरवाट
ही आहे जी
सध्या बंद केली
गेली आहे . सह्याद्रीच्या
रांगेतील आसपासच्या पर्वताचं भव्य
व मनोरम दृश्य
ह्या ठिकाणावरून पाहिल्यावर
मन प्रसन्न होते
. माणिकडोहचा विस्तृत पाण्याचा साठा
आणि त्याच्या कुशीत
वसलेली छोटी छोटी
गावे आपल्याला सुखवस्तू
वाटतात. मोठ्या जलाशयाच्या मध्ये
भागी एक इवलीशी
मच्छिमाराची होडी वाहत
आहे हे पाहून
आपण आपले डोळे
बंद करू शकत
नाही. हे पाहून
आपल्यालाही त्या होडीतून
सफर करावी असे
नक्की वाटते.
धान्याची कोठारे आणि सप्तमातृका
कुंड पाहून आम्ही
पुन्हा वरच्या बाजूला आलो
आणि तळ्याकाठी असलेले
एक भग्न मंदिर
पाहिले .पुरातन अवशेष आणि
दगडावर केलेले नक्षीकाम केवळ
पाहत राहावे असे
आहे. अनेक वर्ष
मेहनतीने केलेलं काम आज
भग्न अवस्थेत होते
. मंदिराचे अवशेष पाहून मला
थोडेसे दुःख झाले
. तळ्याकाठी कोरीव मंदिर आणि
त्यात चाललेली शंकराची
आराधना हे सुंदर
दृश्य माझ्या डोळ्यासमोर
आले होते . कल्पना
कधी कधी सुंदर
वाटतात पण सध्यस्थितीत
मंदिराची पडझड झाली
आहे हे सुखकारक
नक्कीच नाही.
येथून पुढे गेलो
की अनेक छोट्या
मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसतात
. आता मार्च महिना
सूरु होत असताना
काही टाक्या कोरड्या
झाल्या आहेत आणि
काही टाक्यामध्ये पाणी
आहे. असे लक्षात
येते की गड सर
करत असताना. सोबत
पाणी असणे आवश्यक
आहे. कारण गडावर
जरी पाण्याच्या टाक्या
असल्या तरी त्यातील
पाणी पिण्यासाठी अयोग्य
आहे. अनेक पडीक
वाडे पाहत आणि
गडाला जवळ जवळ
प्रदक्षिणा मारून आम्ही पुन्हा
मुख्यद्वाराजवळ पोहोचलो. किल्ल्याच्या तटबंदीला
पण जात जात
भेट दिली . पुन्हा
मुख्य प्रवेशद्वाराशी येऊन
आम्ही थांबलो आणि
थोडी विश्रांती घेऊन
परतीचा प्रवास सुरु केला
आणि अगदी २०
मिनिटामध्ये पायथ्याशी पोहचलो .
 |
सप्त मातृका |
परतीचा प्रवास :
सोनल आणि
राहुल दोघांनी सर्व
नियोजन केले म्हणून
त्यांचे आभार . अनिकेतराव रोकडे
ह्यांनी ह्या वेळी
खजिनदारपद भूषवून मंडळाला हातभार
लावला . नवख्या समाधानने ही
कोणतीही तक्रार न करता
त्याचा पहिला किल्ला सर
केला. सार्वजनिक वाहतुकीची
त्याने धास्ती घेतली नाही
तर तो या
पुढे हि ट्रेक
ला येईल असे
नक्की वाटते.असा
अनुभव आहे कि
परतीचा प्रवास हा पण
खूप मनोरंजक ठरतो
. काही नियोजन नसताना आणि
कोणतीही आगाऊ तिकीट
नसताना आम्हाला पुन्हा कल्याण
गाठायचे होते .चावंडवाडी वरून
आम्हाला जुन्नर ला जाण्यास
एसटी मिळाली परंतु
जुन्नर ते कल्याण
प्रवासासाठी साठी सुखकारक वाहन
मिळाले नाही . जुन्नरला जेवण
करून आम्ही एसटी
साठी प्रयन्त केले
पण यश मिळाले
नाही. शेवटी आम्ही
ओतूर गाठले आणि
तिथे आमचा परतीचा
प्रवास संध्याकाळी ५.३०
ला सुरु झाला
. वाटेमध्ये खुबी फाट्या
जवळ काही शिवभक्तांनी
शिवजयंती निमित्त गोड जिलेबी
दिल्या. मस्त पेट
पूजा करून आम्ही
कल्याण गाठलं आणि एक
चांगला अनुभव घेऊन ट्रेकची
सांगता झाली.
 |
चामुंडा देवीचे मंदिर |
पाऊल संघ : सोनल , राहुल,
अनिकेत , समाधान , नरेंद्र
किल्ल्या विषयी इतिहासः
ह्या किल्ल्याचे अनेक चांगले
संदर्भ इतिहासात सापडतात. येथील
पाण्याच्या टाक्यांचे काम सातवाहन
काली झाले आहे
. निजामशाहीचा संस्थापक " मलिक अहमद
" ला हा किल्ला
मिळाला असा उल्लेख
आहे(१४८५). या
नंतर निजामाचा संदर्भ
मिळतो तो १५९४
मध्ये ! सातवा निजाम दुसरा
बुर्हाण निजामशाह.
याचा नातु बहादुरशाह
१५९४ साली चावंडला
कैदेत होता. त्यांनतर
शहाजी राजे ह्यांनी
निरीजामशाहीला वाचण्या साठी चावंड
हा किल्ला मोगलांना
१६३६ मध्ये दिला
. १६७२ चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड
आणि अडसरगड हे
किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून
घेतले. महाराजांनी याचे नाव
प्रसन्नगड असे ठेवले.
असे अनेक संदर्भ
आपणास मिळतात.
 |
किल्ल्या विषयी इतिहास
|
 |
किल्ल्याचे प्रवेशद्वार
|
 |
मुख्य प्रवेशद्वाराजवळून जाणाऱ्या पायऱ्या |
 |
उखळ सदृश दगडी भांडे आणि जुन्या काळातील टॉयलेट
|
 |
सप्तमातृका कुंडाच्या दरवाज्यावरील सुंदर गणेश मूर्ती
|
गडावर जाण्या वाटेवर असलेली छोटी तोफ - जंबुरका
 |
गडाच्या पायथ्यापासूनच पायऱ्या सुरु होतात |
 |
गडाच्या पायथ्यापासूनच पायऱ्या सुरु होता : पाऊल टीम |
 |
गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या |
 |
गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेसाठी लावलेल्या पायऱ्या |
 |
भक्कम बुरुज |
गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या
 |
ह्या पायऱ्या उंचीने मोठ्या आहेत . ह्या पार केल्यावर मुख्य प्रवेशद्वार येते |
मुख्य प्रवेशद्वाराजवळ
 |
मुख्य प्रवेशद्वार (फोटो आतील बाजूने काढला आहे) |
 |
मुख्य प्रवेशद्वार (फोटो बुरुजासमोरील तटबंदीवरुन काढला आहे ) |
 |
चामुंडा देवी मंदिराजवळ पडलेले अवशेष |
 |
चामुंडा देवी |
 |
सप्तमातृका -पाण्याच्या ७ टाक्या |
 |
किल्ल्यावरुन माणिकडोह व कुकडी जलाशयाचे मनोहरी दृष्य |
 |
भग्न शिवमंदिर |
 |
महादेव मंदिर- याची पूर्णतः पडझड झाली असली तरी पडलेल्या दगडांच्या आकारावरून त्यावरचे सुरेख कोरीवकाम लक्षात येते |
 |
७५० च्या आसपास शिलाहारांनी वंशाच्या राजांनी हे मंदिर बांधले असावे |
 |
हरिश्चंद्र किल्ल्यावरील मंदिरासमोरील तलाव आणी ह्या महादेव मंदिरासमोरील तलाव जवळपास सारखेच आहेत |
 |
सोनल मंदिरातील भग्न अवशेष पाहताना |
 |
महादेव मंदिरावरील शिल्पे |
 |
महादेव मंदिरासमोरील देवळ्या |
 |
धान्याची कोठारे |
 |
धान्य कोठारे / गुहा |
 |
धान्य कोठारे / गुहा |
 |
गडावरील पाण्याच्या टाक्या |
 |
गडावरील पाण्याच्या टाक्या |
 |
गडावरील पाण्याच्या टाक्या |
 |
गडावरील पाण्याच्या टाक्या |
 |
अनिकेत |
 |
समाधान |
 |
राहुल |
 |
सोनल |
 |
नरेंद्र |
 |
नरेंद्र-सोनल-समाधान-राहुल |
 |
बुलबुल |
मुख्य प्रवेशद्वाराजवळ
धान्यकोठाराजवळ
No comments:
Post a Comment